मुंबईहून शिर्डीला जाण्याचे तीन मुख्य मार्ग आहेत — ट्रेन, बस आणि गाडी. आणि जेव्हा वेळ पैशापेक्षा जास्त महत्त्वाचा असतो, तेव्हा flight सुद्धा एक पर्याय. प्रत्येकाची स्वतःची सोय, स्वतःचा खर्च. खाली थेट तुलना — तुमच्या ग्रुपसाठी योग्य मार्ग निवडा:
🚆
ट्रेन
COMFORT
मुंबई CSMT किंवा LTT वरून साईनगर शिर्डी स्टेशनपर्यंत थेट ट्रेन्स चालतात. वेळ 6–7 तास. स्लीपर ₹300–400, AC 3-tier ₹800–1,100. साईनगर स्टेशनपासून मंदिर फक्त 3 किलोमीटर. वृद्ध आणि लहान मुलांसोबत जाण्याचा सर्वोत्तम पर्याय.
🚖
मुंबई → शिर्डी टॅक्सीचा quote हवाय?
कोणता मार्ग कोणासाठी?
पहिल्यांदा जात आहात, कुटुंबासोबत — ट्रेन. आरामदायक, मुलं-वृद्ध सहज सांभाळतात.
कमी बजेट पण पोहोचल्यावर fresh राहायचंय — रात्रीची AC बस.
3–4 जण, ठरलेलं वेळापत्रक नाही — स्वतःची गाडी.
अर्ध्या दिवसाचं दर्शन, संध्याकाळी परत — flight.
बुकिंग कधी करावी
ट्रेन — 60 दिवस आधी खुलते. या route वर तत्काल कमी मिळतं, त्यामुळे लवकर बुक करा.
बस — सामान्य दिवशी 7–10 दिवस आधी पुरेसं; festival दिवशी 3–4 आठवडे आधी.
Flight — जितक्या लवकर बुक तितकं स्वस्त; weekend ला महाग.
जाण्यापूर्वी एक छोटी गोष्ट
IRCTC वर station चं नाव — Sainagar Shirdi (SNSI). फक्त 'Shirdi' टाइप केल्यावर कधीकधी दिसत नाही. station code SNSI ने filter करा.
हे हेल्पफुल होतं का?
कमेंट्स